Advertisement

आदिसखी प्रकल्प महिलांना स्व रोजगार मिळून देणारा एक उपक्रम

अमरावती,

 आदिसखी प्रकल्प महिलांना स्व रोजगार मिळून देणारा एक उपक्रम

आदिवासी विकास विभाग, युनिसेफ आणि सीवायडीए यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आदिसखी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आज, 9 एप्रिल 2025 रोजी, अमरावती आणि नागपूर विभागातील 14 आदिवासी महिलांना आदिसखी प्रशिक्षणाचा समारोप करून प्रमाणपत्र आणि टूल किट वितरीत करण्यात आले.

सदर कार्यक्रम मोजरी, जि. अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माननीय श्री जितेंद्र एन. चौधरी, अपर आयुक्त, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावेळी अमरावती आयुक्त कार्यालयाचे श्रीमती जागृती कुमरे उप आयुक, श्रीमती ममता विधळे साहायक आयुक्त, श्रीमती किरण चंद्रपुरे,  सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री एस. आर. शेख, सहायक प्रकल्प अधिकारी श्री नामदेव केंद्रे, नागपूर आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती गिरीजाताई उईके, युनिसेफ प्रतिनिधी संदीप तेंडुलकर, आदिसखी प्रकल्प अधिकारी योगेश पी पाटील, मास्टर ट्रेनर वैभव जोशी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र आणि टूल किट वितरीत करण्यात आले. महिलांनी वॉश मित्र, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल काम, सोलर रिपेअरींग, वॉटर फिल्टर दुरुस्ती, सुतारकाम, गवंडी काम यासारख्या विविध तांत्रिक क्षेत्रांतील कौशल्ये शिकली. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांमध्ये रितू भारत सिडाम, रेणुका रमेश कोडापे, ज्योस्तना भास्कर उईके, भावना जानरावजी उईके, कविता महादेव धुर्वे, नम्रता सचिन आत्राम, रंजना दीपक मडावी, अलका प्रविण मसराम, कल्याणी दमडू टेकाम, पूजा श्रीधर सिडाम, मनीषा प्रकाश मेश्राम, भारती ओंमप्रकाश मेश्राम, दिपमाला वसंत धुर्वे आणि प्रांजली आशिष उईके यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांना तांत्रिक क्षेत्रात देखील अग्रेसर होण्याचे प्रेरणादायी शब्द दिले. त्याचप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले की, आश्रमशाळांमधील देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी आवश्यक सर्व प्रकारच्या सहकार्याची आम्ही तयारी ठेवू. 

या कार्यक्रमामुळे महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठा पाऊल टाकण्यास प्रेरणा मिळाली. आदिसखी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना स्व रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे उद्दिष्ट साधले जात आहे, जे भविष्यात त्यांच्या जीवनात नवा मार्ग आणि संधी निर्माण करेल.


Post a Comment

0 Comments