Advertisement

रोजस्टर सोसायटी ज्येष्ठ नागरिकांनी नोंदविला संपूर्ण जगाला हदरून सोडणाऱ्या काश्मीर घटनेचा निषेध .मुळशी (अशोक वस्तानी)

*रोजस्टर सोसायटी ज्येष्ठ नागरिकांनी नोंदविला* 

संपूर्ण जगाला हदरून सोडणाऱ्या काश्मीर घटनेचा निषेध
मुळशी (अशोक वस्तानी)
 गायकवाडनगर पुनवळे येथील
रोज अस्टर सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक संघांचे ज्येष्ठ nagrikan रोजी सायंकाळीसोसायटीतील क्लब हाऊस मध्ये एकत्र जमून काश्मिर मध्ये जो मोठा दुःखद प्रसंग घडलेला आहे,ज्यामध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांच्या अमानुष हल्ल्यात आपल्या अनेक निष्पाप देश बांधवांचा बळी गेला आहे, त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.
सभेत सोसायटीतील जेष्ठ नागरिक अशोक देठे, गोविंद प्रसाद झुंजूनवाला, दत्तात्रय वैद्य यांनी आपले विचार मांडले. श्री सतीश भालेराव यांनी या विषयावर एक कविता सादर करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. 

अशा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र 
येऊन सर्व शक्तिनिशी देशातील सरकारच्या पाठीशी आहोत असा विश्वास आपल्या शासनाला, लष्कराला देणे देशाचे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वानी स्तब्ध उभे राहून या भ्याड हल्यात आपल्या दिवंगत देश बांधवाना श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments