Advertisement

ग्रामपंचायत पळशी झाशी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतना व्यतिरिक्त 5000 रुपयाची वाढ.

ग्रामपंचायत पळशी झाशी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतना व्यतिरिक्त 5000 रुपयाची वाढ. 
ग्रामपंचायत पळशी झाशी येथे सौ प्रियंका राहुल मेटांगे सरपंच झाल्यापासून नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना एक तारीख ला पगार देत असते कर्मचाऱ्यांचे नियमित काम, व त्यांची मेहनत बघून ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठराव घेऊन ग्रामपंचायतने कर्मचाऱ्याच्या पगारांमध्ये पाच हजार रुपयाची वाढ करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. व त्याच वेळी त्यांच्या पगार व वाढीव 5000 पगाराचे चेक कर्मचाऱ्यांना देण्यात आले


, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, सचिव हेमंत बापू देशमुख, व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले.
त्यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच पंचफुलाबाई पवार, सदस्य सुरेश भाऊ हेलगे, अनंता भाऊ आमले, अभयसिंह मारोडे, संगीता ताई चितोडे, स्वातीताई कोठे, अमोल दामले, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

अहिल्या न्यूज चॅनल करिता सौ, सरला ताई राजेंद्र ससाणे  ची बातमी 

संग्रामपूर/बुलडाणा

Post a Comment

0 Comments