*भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घोंगडी सत्कार*
बुलढाणा - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलढाणा येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन केले याप्रसंगी भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा घोंगडी सत्कार केला.
सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांची कन्या शिवानी हिच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा येथे आले होते यावेळी त्यांनी बुलढाणा येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवानेते नंदू लवंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांचा घोंगडी व काठी देऊन सत्कार केला.याप्रसंगी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे भारतीय जनता पार्टीचे नेते योगेंद्रजी गोडे सुरेश सिनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments