संबंधित आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तेल्हारा तालुक्यातील धनगर समाज करणार तीव्र आंदोलन
सदरील घटना ही तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील असून फिर्यादी सचिन चिकटे यांच्या फिर्यादीनुसार 15/5/ 2025 च्या सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ सागर शंकर चिकटे हा त्याच्या घरी जात असताना तेल्हारा येथील ,उमेश पांडे , अक्षय भारसाकडे, राहुल मोकळकार तसेच श्रावणी मोबाईल शॉपीचे मालक विनीत युतकार व यश युतकार हे त्यांच्या फोर व्हीलर बोलेरो मध्ये येऊन जस्तगाव येथे आले असता मृत सागर चिकटे याने श्रावणी मोबाईल शॉपी वरून एक मोबाईल उदार घेतला होता. त्याच उधारीच्या पैसे वसुलीसाठी मोबाईल शॉपी चे काही लोक आले. व ते पैसे मागत होते. फिर्यादी सचिनचा चुलत भाऊ सागर यांनी त्यांना सांगितले की मी आज पैसे देऊ शकत नाही. माझ्याजवळ आता पैसे नाहीत. मी उद्या तुमचे पैसे तेल्हारांमध्ये आणून देतो असे त्यांनी विनंती करून सांगितले परंतु यश युतकार याने त्याचे काहीही म्हणणे ऐकता सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली. सागरला वाटले की हे जास्त लोकं मारतील म्हणून तो गावाबाहेर पळत सुटला परंतु वसुली करता आलेल्या लोकांनी त्याचे मागे लागून त्याला पकडून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला गावातील मुख्य रस्त्यावर आणले. व त्याला पूर्ण गावात मारत मारत फिरवत होते. तसेच श्रावणी मोबाईल शॉपी वाल्यांनी त्याला मारल्यामुळे सागरच्या चेहऱ्यावर भीतीचे वातावरण आणि दहशतीचे वातावरण दिसत होते. त्यानंतर मोबाईल शॉपीच्या लोकांनी त्यांच्या जवळील असलेल्या बोलेरो गाडीमध्ये टाकले व त्याला तिथून घेऊन गेले. त्यानंतर तो सकाळपर्यंत दिसला नसल्यामुळे. दिनांक 16 /5/ 2025 रोजी सकाळी आठ वाजता मनोहर चिकटे हे ट्रॅक्टर घेऊन शेतीच्या कामाकरता गेले असता सागर चिकटे हा त्यांना स्वतःच्या शेतामधील निंबाच्या झाडाला फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्यामुळे याला कारणीभूत विनय राऊत , राम प्रशांत मोकळकार, उमेश पांडे, अक्षय भारसाकळे, विनीत युतकार , यश युतकार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील घटना ही सागर वर दडपण आणून यांच्या ज्याच्याला कंटाळून भीतीपोटी सागर याने आत्महत्या केली. वरील सर्व सागरच्या आत्महत्येस कारणीभूत आहे. अशा प्रकारची फिर्याद सचिन चिकटे यांनी दिली आहे. दिनांक 16 5 2025 रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सागरचे सविछेदन करण्यात आले.संबंधित मृत आरोपीस न्याय न मिळाल्यास संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
0 Comments