Advertisement

नांदुरा पोलीस निरीक्षक विलास पाटील, यांची जिल्ह्याबाहेर बदली

नांदुरा पोलीस निरीक्षक विलास पाटील, यांची जिल्ह्याबाहेर बदली
नांदुरा ठाणेदार  विलास पाटील  आता वर्धा जिल्ह्यात विलास पाटील ठाणेदार म्हणून नांदुरा शहरातल्या आल्यावर बहुचर्चित व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाले. नांदुरा येथे येण्यापूर्वी बुलढाणा येथे रिझर्व मध्ये त्यांना टाकण्यात आले होते. त्यापूर्वी मलकापूर ठाण्यात होते आणि त्याच्या अगोदर शेगाव पोलीस स्टेशन चा कार्यभार सांभाळला परंतु तिन्ही ठिकाणी ते यशस्वी? त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे घडून आलेले आहेत तपास मात्र शून्याच्या बरोबरच अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये ते जास्तच वादग्रस्त झाले नांदुरा शहरांमध्ये त्यांना ट्रॅफिक ठाणेदार म्हणून ओळखल्या जायचे,नांदुरा शहरातून व आठवडी बाजारातून मोठ्या प्रमाणावर चोरीस मोबाईल गेलेले आहेत परंतु एकही मोबाईलचा पत्ता  लागला नाही ही विशेष बाब म्हणून त्यांचा सत्कार करायला हवा असे नांदुरा नगरीतील नागरी खुलेआम बोलतात असे समजते..... ठरलेले नांदुरा ठाणेदार विलास पाटील यांना पोलीस प्रशासनाने अखेर वर्धा जिल्ह्यात पाठविले कारण त्यांना पूर्ण पाच वर्षे बुलढाणा जिल्ह्यात झालेले होते . त्यांनी स्वतः एक अर्ज बदलीसाठी दिला होता असे पोलीस चर्चेवरून समजते परंतु ते विचारात घेतले नाही आता  त्यांची बदली वर्धा जिल्ह्यात झाली आहे  हे विशेष.

Post a Comment

0 Comments