रावेर,,जळगाव खा,
रावेर येथे आज दिनांक 27 /05/2024 या रोजी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शिवसेनेचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर चे एकनिष्ठ कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक रावेर शिवसेना तालुका प्रमुख श्री वाय व्ही पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक फार मोठे उत्साहात संपन्न झाली.
त्यात प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी तसेच मुक्ताईनगर प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष उत्तम झुंबडे, सचिव भागवत शेलोडे विजय कोळी यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री वाय व्ही पाटील यांच्या वतीने शिवसेना मधे प्रवेश केल्याने प्रहार ला फार मोठा धक्का बसला आहे.
त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन , रावेर शिवसेना तालुका प्रमुख श्री वाय व्ही पाटील जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित,रावेर यावल विधानसभा शिवसेना क्षेत्र प्रमुख कुणाल भाऊ बागरे,शिवसेना तालुका संघटक भगवानपाटील, लाडकी बहीण योजना तालुका अध्यक्ष राहुल गुरुजी, संजय गांधी कमिटी अध्यक्ष छोटू दादा पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख शुभम चौधरी, शिवसेना रावेर शहर प्रमुख नितिन महाजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्वातीताई भंगाळे, सुनिता ताई कोळी उपतालुकाप्रमुख निखिल नेमाडे, पदाधिकारी विश्वनाथ भाऊ कोळी, चंद्रकांत कोळी ,कैलास भाऊ विकास बाविस्कर नीरज तायड़े तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते.
अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ सरला ताई राजेंद्र ससाणे
0 Comments