Advertisement

सुनगांवात जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड‌..८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल...

सुनगांवात जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड‌..८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल...

पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगांव गावातील गणेश वसुले यांच्या शेतात अवैधरित्या पैशांच्या हार- जितवर जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरुद्ध स्थानिक पोलीसांनी धाड टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दिनांक ३ मे २०२५ रोजी सुनगांव शेत शिवारामधील गणेश वसुले नामक शेतकऱ्याच्या शेतात पैशाचे हार-जितवर जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुनगांव येथील ८ जण अडकले असून त्यांच्या ताब्यातून ५ मोटरसायकली एक १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल व नगदी ९ हजार १०० रुपये असा एकूण २लाख ३४ हजार १५० रूपये किंमतीचा मुद्देमाल व आरोपी पकडण्यात जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय राजकुमार कांबळे, राजपुत,पो.हे.काँ.निलेश पुंडे, अतुल मोहाळे,पो.ना.इरफान शेख,पो.काँ.सचिन राजपुत, अमोल नंदाने, प्रशांत डामरे, पऱ्हाड, कोल्हे यांना यश आले आहे.यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे १) विकास वसुले, अमोल रामभाऊ ताडे, गणेश अंबडकार, संजय मोतीराम भगत, आकाश वसंता भगत, गोपाल भगत, नितीन कुनगाडे . प्रमोद दुबे यांच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान करीत आहेत.

Post a Comment

0 Comments