Advertisement

शेगावात मोठी कारवाई माऊली गेस्ट हाऊस मध्ये अनैतिक देह व्यापारांचा पर्दाफाश

शेगावात मोठी कारवाई माऊली गेस्ट हाऊस मध्ये अनैतिक देह व्यापारांचा पर्दाफाश

शेगाव शहर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत शहरातील माऊली गेस्ट हाऊस येथे चालणाऱ्या अनैतिक देह व्यापाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी घटनास्थळावरून गेस्ट हाऊसचा मालक विजय महादेव पहुरकर, वय ५५ आणि एका ग्राहकाला, शुद्धोधन इंगळे, वय ३६, रा. गोळेगाव यांना अटक केली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माऊली गेस्ट हाऊसमध्ये अनैतिक कृत्यं सुरू असल्याची खात्रीलायक खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, आज दुपारी २:३८ वाजता पोलिसांनी धाड टाकली. या वेळी, आरोपी विजय पहुरकर हा त्याच्या गेस्ट हाऊसमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता आणि ग्राहकांकडून त्याचे पैसे स्वीकारत होता. तर, शुद्धोधन इंगळे हा तेथे ग्राहक म्हणून आलेला आढळला.या धाडमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या यशस्वी कारवाईमुळे शेगाव शहरातील अवैध धंद्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 पोलीस अधीक्षक कार्यालयाने नागरिकांना अशा अवैध कृत्यांची माहिती देण्याचे आवाहन केले

Post a Comment

0 Comments