Advertisement

कृषिकन्यांनी केले सहभागी ग्रामीण मूल्यांकन

कृषिकन्यांनी केले सहभागी ग्रामीण मूल्यांकन

वडशिंगी, ता. 17 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील  विद्यार्थिनींनी ग्रा.कृ. कार्यानुभव व रा.से. यो. अंतर्गत कृषीकंन्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी परसरामपूर परिसरात जनगणनेच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.


या वेळी गावातील लोकसंख्या  जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य योगेश
गवई कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे, कार्यक्रम समन्वयक प्रमोद डव्हळे  आणि विषयतज्ञ श्रीकृष्ण आमले  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता.

कृषिकन्या  स्नेहा इंगळे, प्रणाली इंगळे, संगीता मिसाळ ,प्रियंका दाभाडे ,निकिता खांबलकर ,मेघा थारकर ,खुशी गौर ,अपूर्वा बोडखे ,विशाखा बोरसे ,ममता घुले यांनी उपस्थित सदस्यांकडून . या उपक्रमासाठी गावातील पोलीस पाटील अनंता ठाकरे तसेच ग्राम. पं.सदस्य अनंता गावंडे,ग्राम पं.कर्मचारी भास्कर खोद्रे,आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments