Advertisement

राजुरा बुद्रुक येथील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत.? स्वातंत्र्याचे 75 उलटून गेली तरी गावाला रस्ता नाही.

स्वातंत्र्याचे 75 उलटून गेली तरी गावाला रस्ता नाही.. राजुरा बुद्रुक येथील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत...

जळगाव जामोद तालुक्यातील रसलपुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेल्या राजुरा बुद्रुक या गावाला  स्वातंत्र्याची ७५ री उलटून गेली तरी अद्याप रस्ता नाही. राजुरा बुद्रुक हे गाव राजुरा लघु प्रकल्प आला लागूनच वसलेले आहे येथील लोकसंख्या जवळपास ६०० च्या आसपास आहे. या गावाला पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत निधी मिळत असून त्या निधीचा पुरेपूर वापर ठेकेदार करीत नसून हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला दळणवळणाकरिता अद्याप रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रस्ता बैल गाडीच्या चाकोरीचा असल्याकारणाने या रस्त्यावर मोठ-मोठी डबकी साचलेले आहेत. चिखल तुडवत शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या गावकऱ्यांनी शासनाला अहिल्या न्युज २४ न्यूज च्या माध्यमातून रस्त्याची मागणी केली आहे. राजुरा बुद्रुक येथील जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेला रीतसर बोर्ड सुद्धा लावलेला नाही. शाळेचा परिसर सुद्धा अस्वच्छ व चिखलमय झालेला असून येथील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तरी संबंधित प्रशासनाने या गावकऱ्यांकडे लक्ष देऊन यांच्या भौतिक सुविधेकडे लक्ष देण्याची गरज आहे.. आमच्या गावाला रस्ता द्या अशी मागणी येथील ग्रामस्थ रमेश जमरा, रामलाल बंडल, रमेश वेरसिंग बोंडल,मुरली जमरा, संजय भेलसिंग बोंडल, मारोती मिसाळ, विनोद कनाशा,पुनमसिंग बोंडल, सुनिल चंगळ,आशिराम बोंडल,गिलदार बोंडल यांनी अहिल्या न्युज २४ न्युज च्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments