Advertisement

बिहार येथील महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे करिता जनसंवाद यात्रेचे नांदुरा येथे आगमन

नांदुरा, बुलढाणा 

बिहार येथील महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे करिता जनसंवाद यात्रेचे नांदुरा येथे आगमन,!!

बौद्ध धर्मगुरू भंते विनाचार्य यांच्या धम्म ध्वज जनसवाद यात्रेचे नांदुरा शहरात भव्य स्वागत,! 

चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी स्थापन केलेल्या 84 हजार स्तूपा पैकी काही स्तूपावर ब्राम्हणी अधिपती म्हणून आरुढ झालेले आहे....
त्यामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या पदकमलानी पवित्र  56 देशविख्यात प्रसिद्ध असलेले बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे सुद्धा आजरोजी ब्राम्हण पुजारी यांच्याच ताब्यात आहे..
हा बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय आहे..
ज्याप्रमाणे हिंदू मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे..मदरसा, मजीद मुस्लिम यांच्या ताब्यात आहे.. गुरुद्वारा शीख यांच्या ताब्यात आहे 
त्याप्रमाणे महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात पाहिजेत..
यासाठी वेळोवेळी आंदोलन ही झाली पण अजूनही बोधगया महाबोधी महाविहार मुक्त झाले नाही त्यासाठी पूज्य भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनात महाविहार मुक्ती आंदोलना निमित्त नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई पंचशिल धम्म ध्वज जनसवाद यात्रा सुरू करण्यात आली या जनसंवाद यात्रेचे दिनांक 21/08/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता नांदुरा येथे आगमन झाले असता तथागत नगर वार्ड क्रमांक एक येथे मोठ्या संख्येने उपस्थित उपासक उपासिका यांनी भिक्खू संघाचे जल्लोषात स्वागत केले वॉर्ड क्रमांक एक येथून ढोल ताशा व लेझीम पथकासह मुख्य मार्गाने रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील टाऊन हॉलमध्ये  सभा घेण्यात आली ...
या धम्म ध्वज जनसवाद यात्रेमध्ये नांदुरा शहरासह तालुक्यातील उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन BTऍक्ट रद्द करा,महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या...


Post a Comment

0 Comments