पळशी सुपो येथील ग्रामस्थांचे विविध मागण्या संदर्भात पंचायत समिती समोर आमरण उपोषण,!!
जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील संतोष सोनोने, व ज्ञानेश्वर कोकाटे यांचे वेगवेगळ्या व विविध समस्या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन दिले होते निवेदनात घरकुलचे मष्टरचे पैसे मिळाले नाही,
माहिती अधिकारात माहिती दिली नाही, एल ई डी लाईट खरेदी मध्ये अनियमितता झाल्या प्रकरणी एक वर्ष उलटून ही अहवाल माहिती अधिकारात मिळाला नाही, तसेच अतिक्रमित जागेचे नियमाकूळ करणे, नागरिकांना पिण्याकरिता दूषित पाण्याचा परवठा होत असून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ करणं,
अपंगत्वाचा निधी तात्काळ उपलब्ध करा अस्या विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले होते निवेदनात नमूद मागण्या संदर्भात शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर निवेदन करता यांनी दिनांक 25/8/2025,रोजी पासून पंचायत समिती जळगाव जा समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरु केले,मागण्या ची पूर्तता होई प्रयन्त उपोषण सुरु राहील अशी मीडिया समोर उपोषण करता यांनी प्रतिक्रिया दिली,,
अहिल्या न्युज24 चॅनल करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे,
जळगाव जा, बुलढाणा
0 Comments