जय गजानन मंडळाच्या वतीने श्री गणेश चरणी 1000 आवर्तन
खामगाव
श्री गणेश उत्सवानिमित्त येथील सुटाळपुरा भागात असलेल्या जय गजानन नवयुवक दलाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त श्री गणेश अथर्व शीर्षाच्या पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर दि.28 ऑगस्ट रोजी मोठ्या भक्ती भावात सायंकाळी सात वाजता श्री गणेश अथर्व शीर्षाचे पठण करण्यात येणार आहे. स्थानिक घाटपुरी रोडवरील श्री संत संताजी महाराज सुटाळपुरा यांच्या प्रतिमेजवळ हजारो महिला पुरुष व नागरिकांच्या उपस्थितीत हे वाचन करण्यात येणार आहे अथर्वशीर्ष वाचनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला जय गजानन मंडळाच्या वतीने अथर्वशीर्षाची पुस्तिका निशुल्क भेट देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा खामगाव शहरातील समस्त नागरिकांनी महिला मंडळांनी तरुण युवक,युवती यांनी सहभागी व्हावे व धार्मिक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन जय गजानन नवयुवक दलाच्या वतीने केले आहे.
0 Comments