Advertisement

स्वराज विजय सोनाग्रे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये सहावा क्रमांक

स्वराज विजय सोनाग्रे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये सहावा क्रमांक 

चिरंजीव स्वराज विजय सोनाग्रे हा सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन 2025 मध्ये इयत्ता 5 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आलेला आहे  सदर विद्यार्थी तुलसी बाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन नांदुरा येथे शिकत असून त्याचे आई-वडील विजय सोनाग्रे व सुषमा सोनग्रे हे दोघेही उभयता शिक्षक म्हणून कार्यरत आहे स्वराज हा राज्य गुणवत्ता यादीमध्ये सीबीएससी बोर्ड मधून सहावा क्रमांकाने व बुलढाणा जिल्ह्यामधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. त्यानिमित्त  दिनांक 13 /8 /2025 रोजी मा. गटविकास अधिकारी नांदुरा श्री भारतजी हिवाळे साहेब मा गट शिक्षणाअधिकारी श्री जितेंद्र प्रधान साहेब मा.शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल तरमळे साहेब विस्तारित अधिकारी श्री प्रशांत जामोदे साहेब वरिष्ठ लेखा लिपिक श्री शाम अत्तरकर यांनी नांदुरा पंचायत समितीच्या वतीने स्वराज व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार आयोजित केला होता व माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी स्वराज्यचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. स्वराज आपल्या यशाची श्रेय त्याचे शिक्षक वृंद व आई-वडील यांना देतो.

Post a Comment

0 Comments