दिनांक : 13 ऑगस्ट 2025
स्थळ : बुलढाणा
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व चर्चासत्र संपन्न.
बुलढाणा : लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर सन 1767 ते 1795 या दरम्यान इंदूर सह देशभरात अद्वितीय कार्य केले. धर्मशाळा, समाज मंदिर, पाणी, शेती, न्यायव्यवस्था, सर्वधर्मसमभावाची समाज रचना अशा विविध आघाड्यावर त्यांचे कार्य आजही अजरामर आहे. परिस्थितीवर मात करून संघर्ष योद्धाची भूमिका सक्षमपणे पार पाडणारी लोकमाता अहिल्यादेवी सदैव प्रेरणादायी राहतील.असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वन्यजीव सोयरे चे संस्थापक जयंत हिंगे यांनी व्यक्त केले.
स्थानिक राऊत कॉम्प्लेक्स, जांभरुण रोड, बुलढाणा येथे आज सायंकाळी 5.00 वाजता विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानातून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी हिंगे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
____
विविध सामाजिक संघटनांचे आयोजन.
आझाद हिंद शेतकरी संघटना, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, राष्ट्रीय बजरंग दल, ग्राम स्वराज्य समिती व महानायक विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
__
प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. चर्चासत्राला दारूबंदी अभियानाचे भाई रजनीकांत, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, रमाई ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे व राम व्यवहारे, राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष भूपेश पाटील, आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड यांची उपस्थिती होती.
चर्चासत्रामध्ये भीमराव जाधव, शंकर लोखंडे, वासुदेव जाधव, संजय एंडोले, सुरेश जाधव, शेख अफसर, सारंगधर व्यवहारे, प्रशांत जाधव, प्रवीण जाधव, शेषराव जाधव, संदेश जाधव, प्रभात जाधव, विजय भाकरे आदींनी सहभाग घेत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन योगेश तायडे यांनी केले, प्रास्ताविक योगेश कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन पंचफुलाबाई गवई यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
&___
बुलढाणा :
दिनांक :13 ऑगस्ट 2025
0 Comments