*हार्ट अटॅक रुग्णाला उपचार नाकारणाऱ्या डॉक्टर कोथळकर यांच्यावर कारवाईची मागणी* - *मनोज जाधव*
बुलढाणा (प्रतिनिधी) – दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा येथील ‘अमृत हृदयालय डॉ. कोथळकर यांच्या हॉस्पिटल’ मध्ये गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या हार्ट अटॅक रुग्णाला उपचार नाकारल्याचा व रुग्णाच्या नातेवाईकांशी गैरवर्तन, शिवीगाळ तसेच पत्रकाराचा मोबाईल हिसकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, रुग्णाला तातडीने ECO तपासणीची आवश्यकता असतानाही डॉक्टरांनी अरेरावीची भाषा वापरून तपासणी नाकारली. यावेळी रुग्ण गंभीर अवस्थेत असूनही हार्ट अटॅक रुग्णाला ECO करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास रूमच्या बाहेर उभे ठेवले
नातेवाईकांनी विचारले पेशंट उभ्या राहण्याच्या अवस्थेत नाही त्यांना एवढा वेळ उभे का ठेवता स्टाफने डॉक्टरांना आवाज देऊन बाहेर बोलावले नातेवाईकांनी डॉक्टरला विचारणा केली असता डॉक्टरांनी ECO करण्यास पुढची ट्रीटमेंट करण्यास नकार दिला. आणि त्यांचा स्टाफ बोलावून धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेदरम्यान माहिती विचारत असताना उपस्थित पत्रकाराचा डॉक्टर कोथळकर यांनी मोबाईल हिसकावून त्यांच्याशी देखील गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी.
तसेच, घटनेच्या वेळचे हॉस्पिटलमधील सर्व CCTV फुटेज जतन करण्याची व डॉक्टर कोथळकर यांच्या हॉस्पिटल मधील वेटिंग रूम आणि त्यांच्या कॅबिनची तपासणी करण्यात यावी. व रुग्णाला न्याय मिळवून द्यावा. आशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
0 Comments