Advertisement

श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोली जहागीर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोली जहागीर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
      श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोली जहागीर येथे 15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. अजय भाऊ गुणवंतराव ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष श्री ढेंबरे साहेब तसेच श्री पांडुरंग ठाकरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री .अशोक खंडारे सर यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी 
प्राणाचे बलिदान देणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांच्या योगदाना बद्दल माहिती दिली. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे सांगितले. देशप्रेम व देशाभिमाना देशाच्या प्रगतीसाठी किती आवश्यक आहे हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. कार्यक्रमामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन तसेच स्वातंत्र्य दिना निमित्त भाषणे दिली. त्यानंतर विविध देशभक्तीपर गाण्यांवर कवायती तसेच व्यसनमुक्तीची सर्व विद्यार्थी शिक्षकांनी प्रतिज्ञा घेतली. गावकरी मंडळींनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
       विविध कवायतींचे संचालन श्री मानकर सर यांनी. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री काळे सर यांनी केले..

Post a Comment

0 Comments