Advertisement

धाड, बुलडाणा,ग्रामपंचायतीतील अनियमितते विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण,!!

धाड, बुलडाणा,

ग्रामपंचायतीतील अनियमितते विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण,!!
 अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी महाराष्ट्र संघटनेतर्फे धाड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस कामांच्या बिलांबाबत सखोल चौकशीची मागणी करत 14 ऑगस्ट 2025 पासून पंचायत समिती बुलढाणा येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता.
 निवेदनात स्वराज पोर्टलवरील खर्चाच्या नोंदी, लेखापरीक्षण विभागाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अनेक गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. प्रत्यक्षात न झालेली कामे पूर्ण झाल्याचे दाखवून बोगस बिले तयार करण्यात आली असून, संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप निवेदन तुन करण्यात आला .

या प्रकरणी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने संघटनेने स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वी 14 ऑगस्टपासून उपोषण ला शुरुआत केली, योग्य ती कार्यवाही न झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन यंत्रणेवर राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी, बोगस कामांवर झालेला सर्व खर्च वसूल करावा.चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. कथित भ्रष्टाचारामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आता या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहिल्या न्युज 24करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी 

बुलडाणा, धाड

Post a Comment

0 Comments