Advertisement

जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा गैरव्यवहार उघड – पगार सुरू पण शाळेत हजेरी नाही!सोनाजी नगर शाळेला चौथा शिक्षक नाकारला – शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह

जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा गैरव्यवहार उघड – पगार सुरू पण शाळेत हजेरी नाही!


सोनाजी नगर शाळेला चौथा शिक्षक नाकारला – शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह

 सोनाळा : सोनाजी नगर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांचा गंभीर गैरव्यवहार समोर आला आहे. ऑनलाईन दाखल्यात एक शिक्षक कार्यरत दाखवला जात असून त्याचा पगार देखील बुलढाणा येथील कार्यालयातून सुरू आहे.
 मात्र प्रत्यक्षात तो शिक्षक शाळेत रुजू झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेला एकूण चार शिक्षकांची आवश्यकता असून या बनावट दाखल्यामुळे चौथा शिक्षक मिळालाच नाही. परिणामी आजतागायत शाळेत केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून पालक व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सदर शिक्षकाचा शालार्थ आयडी अद्याप ऍक्टिव्हेट असल्याने प्रशासनाच्या नजरेत तो कार्यरत दाखवला जात आहे. प्रत्यक्षात मात्र शाळेवर अनुपस्थित राहूनही त्याचा पगार सुरू राहणे ही शिक्षण विभागाच्या कारभारातील मोठी त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने चौथा शिक्षक शाळेत नियुक्त करण्याची मागणी केली आहे. ऑनलाइन पोर्टलवर  मंजूर शिक्षक दिसत असल्याने या शाळेवर रिक्त जागा दिसत नाही, म्हणून या शाळेवर चार जागा असूनही एका शिक्षकाने जागा भरून घेतल्याने येथे चौथा शिक्षक मिळणे नाही. त्याकरिता शाळेचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री सुमेध भाऊ दामधर व शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर यांनी शिक्षण विभाग बुलढाणा, शिक्षण विभाग संग्रामपूर व गटशिक्षणाधिकारी साहेब यांना याविषयी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. अद्यापही त्या निवेदनावर खुलासा मिळाला नाही. तरी गहाळ असलेला ऑनलाइन शिक्षक दिसत आहे. याची नियुक्ती २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सोनाजी नगर जिल्हा परिषद शाळेवर झालेली असून तो अद्यापही शाळेवर रुजू झालेला नाही, तरी पण त्याचा शालार्थ आयडी ॲक्टिव्ह असून तो शिक्षण विभाग बुलढाणा येथून पगार घेत आहे. तरी यावर शिक्षण विभागाने लवकरात लवकर खुलासा करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी शाळेच्या व्यवस्थापन समितीतर्फे तथा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments