Advertisement

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे शांतता कमिटीची सभा संपन्न.


 सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे शांतता कमिटीची सभा संपन्न.


श्री गणेश स्थापना व ईद निमित्त जळगाव जामोद येथे जळगाव जामोद,सोनाळा व तामगाव या तीनही पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शांतता सभेचे दिनांक 25 ऑगस्ट रोजी आयोजन सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे होते तर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, एस डी ओ शैलेश काळे, पो नि श्रीकांत निचळ,तहसीलदार पवन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सुनील अंबुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर संदीप वाकेकर, अजय वानखडे , अब्दुल गफार,प्रशांत तायडे, गजानन वाघ, यांच्यासह मान्यवरांनी गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद निमित्त जळगाव जामोद शहरासह तालुक्यात गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादचा सण शांततेत व उत्साहात कोणतेही गालबोट न लागता पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष भाषणात बोलताना पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की लेझर लाईट बंदी, डीजे बंदी व तरुणांनी शांतता राखत व कुठलेही आमिष वा सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज ला बळी पडू नये तसेच शिकून जेवढे ज्ञान आपण घेऊ शकतो तेवढे घेण्याचा प्रयत्न करावा वाचाल तर वाचाल तसेच सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले. तरुण पिढी जी भरकट जात आहे यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे, मागील काळात शहरात सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जी घटना झाली त्यामुळे जळगाव जामोद शहराचे नाव हे रेड अलर्ट म्हणून आले आहे त्यामुळे ही एकमेकांच्या धर्माबद्दल आष्टा ठेवून सण उत्सव साजरे करावे. जळगावकरांनी यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये याकडे लक्ष द्यावे जेणेकरून जळगाव जामोद शहरावरील हा कलंक पुसल्या जाईल यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवा असे यावेळी ते म्हणाले. यावेळी जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, मुस्लिम बांधव, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, उपस्थित होते.जळगाव जामोद पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी शांतता कमिटीची बैठक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले

Post a Comment

0 Comments