रुबल फाऊंडेशन आणि तरुणाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि अत्यंत सुबक, सुंदर अशा पर्यावरणपूरक गणपती मूर्ती घडवल्या. आज या मूर्तींचे शाळेत प्रदर्शन लावण्यात आले, ज्याला शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी हानिकारक रसायने आणि मातीच्या प्रदूषणाला ठामपणे नकार देत पर्यावरणपूरक मार्गाचा स्वीकार केला आहे. *लवकरच या पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तींची स्थापना सुनगाव येथील ४० घरांमध्ये होणार असून, या उपक्रमातून जबाबदार, पर्यावरणपूरक आणि सजग गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचवला जाईल.*
रुबल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आणि शाश्वत विकासाची वाटचाल करण्याखेरीज पर्याय नाही असे मत व्यक्त केले. सालईबन परिवाराचे श्री. मनतिज सिंग यांनी हा उपक्रम सर्जनशीलतेला चालना देणारा आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अंगीकार करण्याबाबत जनजागृती निर्माण करणारा असल्याचे सांगितले. तरुणाई फाऊंडेशनच्या सुचिता उमाळे यांनी या उपक्रमाला प्रेरणादायी असे संबोधले.
या कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापक श्री. सोळंके यांच्यासह शाळेतील अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments