*मा.श्री.पै.तानाजी भाऊ जाधव. राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुप यांच्या नेतृत्वाखालील कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरवणार*
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, टायगर ग्रुप उपजिल्हा खामगांव [MH56] चे अध्यक्ष मा.श्री. पै. पियुष भाऊ चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून खामगांव शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात गरजूंना मदत करणे, रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करणे, तसेच गरजूंना मोफत अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणे यांसारख्या उपक्रमांचे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वी आयोजन केले. याशिवाय, अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे, विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, तसेच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे - ही त्यांची कार्यपद्धती सदैव उल्लेखनीय ठरली आहे आतापर्यंत त्याना 6 वेळा विविध संघटनांकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून,जात,पात, धर्म किंवा पक्ष न पाहता निस्वार्थपणे सेवा करण्याची त्याची वूत्ती विशेष कौतुकास्पद ठरली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय दर्पण कार गौरव पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करणार आहे खामगांवकराच्या मते,मा, श्री, पै, पियुष भाऊ चव्हाण यांची कार्यपद्धती केवळ मदतीपुरती मर्यादित नसुन,ती, प्रत्येक नागरिकात विश्वास आणि प्रेरणा निर्माण करणारी आहे त्यामुळे ते खामगांवच्या समाजसेवेत एक आदर्श व्यक्तिमत्व ठरली आहेत
0 Comments