दिनांक 09/09/2025 रोजी वनअधिकारी श्री ए एन बावने वनपरीक्षेत्र अधिकारी सोनाळा यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या पिंगळी बिट बफर क्षेत्रात अवैधरीत्या मेढी चराई करतांना 180 मेढी चराई करणे बाबत. मोक्यावर नामे नंदु सोनाजी डोमाळे रा. पिंगळी जाहा. ता. संग्रामपुर जि. बुलढाणा यांना मुददेमालासह मोक्यावर ताब्यात घेण्यात आले. त्याचे भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (1-A) (a) 52 प्रमाणे वनगुन्हा क्र. 05990/149740 दिनांक 09/09/2025 रोजी जारी करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. आदर्श रेडडी भावसे. वनसंरक्षक, तथा क्षेत्रसंचालक मेव्याप्र. अमरावती मा. आर एस टोलिया (भावसे.) उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग अकोट, श्री जी पी टेकाळे सहा. वनसंरक्षक अकोट वन्यजीव विभाग अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा हे तपास करीत आहे.
सदर कार्यवाहीमध्ये सोनाळा परीक्षेत्रातील श्री ए एन बावने वनपरीक्षेत्र अधिकारी सोनाळा श्री एस डी राठोड वनपाल,, श्री एस के घुगे वनपाल, श्री पी ए जगरवाल वनरक्षक, श्री के एच मोरे वनरक्षक, श्री डी ए बेराड वनरक्षक, व सोनाळा परीक्षेत्राचे अधिनस्त कर्मचारी. सहभागी होते सदर प्रकरणी भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तरी सर्व नागरीकांना आवाहण करण्यात येते की अशी कोणतीही माहीती मिळताच 1926 या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी.
0 Comments