Advertisement

आरोग्य विभागाच्या पत्राला ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांनी दाखवली केराची टोपली

आरोग्य विभागाच्या पत्राला ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांनी दाखवली केराची टोपली 
 जळगाव जामोद प्रतिनिधी 

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत हि
साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून  ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र सूनगाव येथे दिसत आहे ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबके साचलेले आहे या साचलेल्या पाण्यामुळे  डासांची उत्पत्ती झालेली आहे व ठीक ठिकाणी गवत हे वाढलेले आहे त्यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे त्यावर तन नाशक फवारणी करावी व गावात धूर फवारणी करावी गावात मच्छरांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलरा डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण होण्याची दाट शक्यता आहे सध्या स्तिथी या गावामध्ये 
 तापाचे बरेच रुग्ण आढळून येत आहेत  गावातील  नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे मागील  दोन वर्षांपासून ग्रामपंचायत   कडून  गावामध्ये धूर फवारणी झालीच नाही या  तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये तन नाशक फवारणी व धुर फवारणी झालेली आहे. त्यातच सतत पाऊस चालू असल्यामुळे गावात पावसाचे पाणी साचलेले जागोजागी डबके आहे त्यामध्ये डासांची मोठी उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे  पोटाचे विकार व तापीचे आजार पसरत आहे तरी सूनगाव ग्रामपंचायत कडून  नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही जसे पिण्याचे शुद्ध  पाणी  व धूर फवारणी तर केलीच नाही. या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष फक्त गरज भासत आहे अशी बातमी प्रदर्शित होताच आरोग्य विभागाने 8 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतला या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले परंतु 3 ते 4 दिवस होऊन  ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांनी कोणतेच उपायोजना न करता  पत्राला सरळ केराची टोपली दाखविली आहे

Post a Comment

0 Comments