Advertisement

किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांचा विशेष सन्मान याकूब शेख विशेष जिल्हा प्रतिनिधी अहिल्या न्यूज 24

*किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांचा विशेष सन्मान*                   (याकूब शेख विशेषजिल्हा प्रतिनिधी अहिल्या न्यूज 24) किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत नुकतेच पार पडलेले कवाळ यात्रा पोळा ईद-ए-मिलाद गणपती विसर्जन यासारखे विविध सण अत्यंत शांततेत पार पडले या सणाच्या काळात पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट बंदोबस्त राखून सामाजिक सलोखा व शांततेची परंपरा टिकून ठेवली या अनुषंगाने किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांना त्यांच्या कुशल नेतृत्वासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडून विशेष गौरव करण्यात आले आहे संजय मातोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस दलाने योग्य नियोजन चोख बंदोबस्त सतर्क गस्त तसेच स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्थांशी समन्वय राखून काम केले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता सर्व सन आनंद व शांततेत पार पडले

Post a Comment

0 Comments