Advertisement

जलसंधारण जिल्हा परिषद ल पा खामगाव अंतर्गत मौजे वावडी हर्दो शिवारातील निरव व कोरडी नदीवरील दर्जाहीन बंधाऱ्याची चौकशी संबंधित ठेकेदार व देखरेख कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे बाबत

जलसंधारण जिल्हा परिषद ल पा खामगाव अंतर्गत मौजे वावडी  हर्दो शिवारातील निरव व कोरडी नदीवरील दर्जाहीन बंधाऱ्याची चौकशी संबंधित ठेकेदार व देखरेख कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे बाबत माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना अमोल ज्ञानेश्वर तायडे यांनी दिनांक 17 /6/ 2025 रोजी निवेदन सादर केले आणि त्यानंतर दिनांक7/8/2025 रोजी स्मरणपत्र देऊन दिनांक1/9/ 2025 पासून उपोषणास सुरुवात झाली. अमोल ज्ञानेश्वर तायडे यांची मागणी ही रास्ता आहे करिता वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद त्यांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे.


   पाठिंबा देतेवेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक,ज्येष्ठ नेते साहेबराव भगत,तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई, अँड संदीप उगले,जिल्हा सदस्य स्वप्निल गवई,मीडिया प्रमुख रवींद्र जाधव,जिल्हा उपाध्यक्ष अताउल्ला खान,तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे,भाास्कर जुंबळे, तानाजी गवई,बाळू तायडे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments