मा . शांतारामभाऊ व दाणे परिवाराचे शतशः आभार ! !👏🏾
शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम भाऊ दाणे व त्यांच्या परिवाराचे शतशः आभार व्यक्त करतो . त्याचे कारण असे की ज्याने आमच्या संकटाचा भार सोसला त्याचे आभार व्यक्त करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे . . . काल दिनांक एक सप्टेंबर सोमवार रोजी रात्री आठ वाजता माझा मुलगा श्रीजीत हा शेगावहून घरी येत असतांना खिरोडा येथे पूर्णा नदी पुलाजवळ कोल्ही नावाचे जनावर रस्त्या त आडवे गेल्याने मोटरसायकल अपघात झाला . या गंभीर अपघातामधून आमचा श्रीजीत सुखरूप बचावला हे आमचे सुदैव व खिरोडा येथील दाणे परिवाराचे आमचे वर उपकारच . . . अपघात स्थळी आम्ही पोहोचण्या अगोदरच शांताराम भाऊ व त्यांच्या परिवाराने आमच्या जखमी श्रीजीतला खामगाव येथील दवाखान्यात पोहोचवले होते . यानंतर आम्ही पोहोचलो . दाणे परिवाराच्या अशा या समय सुचकतेमुळे आमचा श्रीजीत आज सुखरूप असुन त्याचेवर उपचार सुरू आहे त . दाणे परिवाराच्या प्रासंगीक समय सुचकते मुळे आमच्या परिवारावर आलेले संकट टळले याबददल आम्ही त्यांचे त्यांचे मनापासुन आभार व्यक्त करतो . त्यांना आई भवानी अशा सत्कार्यासाठी शक्ती देओ अशी प्रार्थना करतो !!!
आभारकर्ते .
विलासराव देशमुख व परिवार
संग्रामपूर ( जि बुलडाणा )
0 Comments