Advertisement

स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न.. जळगांवात शिवसेना आक्रमक..

स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न.. जळगांवात शिवसेना आक्रमक.

मुंबई येथील शिवाजी पार्क स्थित स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून विटंबना केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलेले असुन.आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वाखाली या विटंबनेच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.यावेळी जळगाव जामोद येथील छत्रपती संभाजीराजे चौकात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत सम्पूर्ण परिसर दणाणून सोडला होता.


यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि विटंबने सारख कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. "जर आज संध्याकाळपर्यंत पोलीसांनी या समाजकंटकांना अटक केली नाही, तर उद्या दिनांक १८ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी दिला आहे.यावेळी जिल्हासंपर्कप्रमुख दत्ता पाटील,उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख संतोष दांडगे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान, विधानसभा प्रमुख भिमराव पाटील, शहरप्रमुख रमेश ताडे, उपशहर प्रमुख चांद कुरेशी, कैलास राजपुत, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे, विशाल पाटील, अताऊल्ला खान, अशोक माने,संजय दंडे, युवराज देशमुख यांचेसह बहुसंख्य शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments