Advertisement

सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे संत्रा फळगळ, पिकांच्या नुकसानीची व केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती किंटल भावफरक मिळणे बाबत तहसीलदार व कृषी मंत्री यांना निवेदन

*सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे संत्रा फळगळ, पिकांच्या नुकसानीची  व केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती किंटल भावफरक मिळणे बाबत तहसीलदार व कृषी मंत्री यांना निवेदन*

*तहसीलदार यांचे तत्काळ नुकसान तपासणी चे निर्देश* 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून 
जळगाव जामोद तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर  २०२५ मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे संत्रा फळ गळ , कापूस, सोयाबीन, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसान  बाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद आहे की सदर  नुकसानीची  शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत व विमा मिळावा व केळी चे दर कोसळल्या मुळे झालेल्या नुकसाना करिता म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती किंटल नुकसान भरपाई म्हणून मिळावे ही विनंती.
  तालुक्यातील जामोद, सुनगाव, रसलपूर, निमखेडी,  कुंवरदेव, उसरा बु, उसरा खु, चालठाणा खु, चालठाणा बु, सोनबर्डी, कहूपट्टा, वावडी हरदो,गोराळा, कौलखेड, तरोडा, खेल लोण, खेल शिवापूर, खेल वर्गे, खेल माळी, खेल पारस,वनुर,सजनपुरी, राजुरा बु, राजुरा खु, महमदपुर, ततारपुर, खामखेड, पिंपळगाव, आसलगाव, खेर्डा, वडशिंगी, भेंडवाड  व इतर गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
सततचा पाऊस, अतिवृष्टी, किड व विविध रोगांमुळे संत्रा फळ गळ , कापूस, सोयाबीन, भाजीपाला व इतर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच केळी चे दर १८०० रुपये प्रती कि. वरून ५०० रुपये प्रती कि. पर्यंत कोसळल्या मुळे झालेल्या नुकसाना करिता केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती किंटल नुकसान भरपाई म्हणून मिळावे ही विनंती.
 तरी प्रातिनिधिक पंचनामे करून  जळगाव जामोद तालुक्यात पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी.
  सदर शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत न मिळाल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तरी जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारे व सतत च्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी व तसेच केळी चे दर कोसळल्या मुळे झालेल्या नुकसाना करिता म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती किंटल नुकसान भरपाई म्हणून मिळावे ही विनंती.
यावेळी बोलतांना जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिवाळी पूर्वी सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे परखड मत व्यक्त केले. 
यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडी चे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments