Advertisement

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सूनगाव येथे पत्रकार गजानन सोनटक्के यांचा सत्कार

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक  शाळा सूनगाव येथे  पत्रकार गजानन सोनटक्के यांचा सत्कार

 जळगाव जामोद तालुक्यातील नावलौकिक असलेल्या  MCN न्यूज चॅनलचा 12 वा वर्धापन दिन नुकताच 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथील सांस्कृतिक भवन येथे मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला या कार्यक्रमात एमसीएन न्यूज चे महाराष्ट्रातील सर्व रिपोर्टर उपस्थित झाले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  माजी मंत्री डॉ संजय कुटे व इतर मान्यवर हे होते या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील जळगाव तालुका प्रतिनिधी गजानन सोनटक्के यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाला त्यादृष्टीने  आज दि  4 सप्टेंबर रोजी पत्रकार गजानन सोनटक्के यांचा  जिल्हा परिषद शाळा सुनगावं येथे सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गजानन सोनटक्के हे एम सी एन न्युज चॅनलचे जळगाव  प्रतिनिधी असून त्यांना एमसीएन उत्कृष्ट जाहिरात संकलन 2020 व उत्कृष्ट पत्रकार 2021 आणि नुकताच एमसीएन उत्कृष्ट पत्रकार 2025 हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीरसागर मॅडम यांनी केले यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बेग सर  शिक्षक कर्मचारी व सुनगाव येथील पत्रकार अनिल भगत शिवदास सोनोने हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments