दलित वस्ती विकास रस्ता कामात भ्रष्टाचार
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत हे नेहमीच चर्चेत असते अशाच काही मागील दिवसात सुनगाव येथील वार्ड क्रमांक एक मध्ये किसन वसुले ते वासुदेव गवई यांच्या घरापर्यंत समोरील रस्ता हा
दलित विकास निधीतून काँक्रीट रस्ता होता व त्याचे काम हे योग्यरित्या होत नसल्याची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे दाखल केली आहे या रस्ता कामात दलित वस्ती निधी गैरवापर व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पांडुरंग गवई यांनी केला आहे या रस्त्यामध्ये खोलीकरण हे अंदाजपत्रकानुसार केलेले नाही व त्यामध्ये 80 एमएम वापरलेले नाही व सिमेंट काँक्रीट जाडीची (थिंक ) व्यवस्थितरित्या नियमानुसार झालेली नाही व या रस्त्याचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार झालेले नाही तरी या झालेल्या निधीचा गैरवापर व भ्रष्टाचाराची चौकशी करावी व सरपंच रामेश्वर अंबडकार व ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व कारवाई झाल्याशिवाय सदर कामाचे देयक अदा करू नये अशी तक्रार 30 सप्टेंबर 2025 रोजी जळगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे आहे
0 Comments