Advertisement

मातोश्री नथीयाबाई विद्यालय येथे शिक्षक दीपक उमाळे यांचा सत्कार

मातोश्री नथीयाबाई विद्यालय येथे शिक्षक दीपक उमाळे यांचा सत्कार

 आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी सूनगाव येथील मातोश्री नाथीयांबाई विद्यालय येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दीपक उमाळे सर यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजकुमार सिंह राजपूत प्रमुख अतिथी डॉ कुलदीप सिंह राजपूत बळीराम वंडाळे  पत्रकार गजानन सोनटक्के यांची मंचावर उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला  सत्कारमूर्ती दीपक उमाळे यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना शिक्षक दीपक उमाळे यांनी चारबन शाळेमध्ये राबवलेले विविध उपक्रम विशद केले व पुरस्काराबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार राजकुमार सिंह राजपूत यांनी उमाळे यांच्या कार्याचा गौरव करून शिक्षकांनी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले यावेळी मातोश्री नथीयांबाई विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments