सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.भूषण गवई यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला निंदनीय!
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा.भुषण गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला भ्याड असून अत्यंत निंदनीय आहे या मनुवादी बुरसटलेल्या विचारांच्या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे यासाठी महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत मुकेश अशोकराव वाकोडे यांनी निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की,हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे, तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवरील व लोकशाही व्यवस्थेवरील गंभीर हल्ला आहे.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच भविष्यात न्यायमूर्तींच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी,
देशातील न्यायव्यवस्थेचा सन्मान, प्रतिष्ठा आणि लोकांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी आपण तातडीने लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे नांदुरा तहसीलदार यांना निवेदन देतेवळी मुकेश अशोकराव वाकोडे,अनिल सकळकर, श्रीकृष्ण धुंदळे,
अक्षय पहूरकर,मोहन वाघ,योगेश अबोळे, भागवत देवचे आदी उपस्थित होते.
अहिल्या न्युज 24 करीता,सौं सरलाताई राजेंद्र ससाणे
0 Comments