Advertisement

एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात “संविधान आणि प्रशासकीय कायदा – उदयोन्मुख कल आणि आव्हाने” विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात “संविधान आणि प्रशासकीय कायदा – उदयोन्मुख कल आणि आव्हाने” विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

(पिंपरी-चिंचवड ) सुभद्रा एजुकेशन सोसायटीचे, एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात “संविधान आणि प्रशासकीय कायदा – उदयोन्मुख कल आणि आव्हाने” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आले.  


या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. अभिराजी बाहुलयन यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट संविधान व प्रशासकीय कायद्यातील बदलते कल, नव्या आव्हानांची ओळख आणि न्यायव्यवस्थेतील आधुनिक प्रवाह समजावून सांगितलेएस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप  मॅडम यांनी स्वागतपर भाषण करत संविधानाच्या गतिशीलतेवर आणि विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. *या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ प्रा. उल्हास बापट उपस्थित होते.* आपल्या प्रमुख भाषणात त्यांनी भारतीय राज्यघटनेची स्थैर्य आणि तिच्या संवर्धनात विधी विद्यार्थ्यांची जबाबदारी अधोरेखित केली, त्याचबरोबर संविधानिक मूल्ये प्रत्यक्ष जीवनात रूजविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “संविधानातील न्यायसंगतता, शासनातील पारदर्शकता, प्रशासनातील उत्तरदायित्व आणि न्यायिक पुनरावलोकन” या विषयांवर सविस्तर व्याख्यान दिले. या कार्यक्रमप्रसंगी ए. के. के. खान  विधी महाविद्यालयाच्या सहाय्यक  प्राध्यापक डॉ. स्वाती शिंगाटे यांनी प्रशासकीय कायदा आणि सुव्यवस्था यावर आपले विचार मांडले. 
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. डी. के. भोसले., संस्थेच्या प्रेसिडेंट डॉ. वृषाली भोसले, संस्थेच्या संचालक अँड. डॉ. ऋतुजा भोसले उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमप्रसंगी एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. एल. एमचा विद्यार्थी सुनील लोखंडे यांनी केले. या  कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. उज्वला भारती यांनी  एक दिवसीय कार्यशाळेस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साहाय्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थांचे मनःपूर्वक आभार मानले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संविधानिक मूल्यांची सखोल जाणीव करून देणारी ठरली.

Post a Comment

0 Comments