अध्यात्मिक,वारकरी संस्थांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.
हभप.वासुदेव शास्त्री.
वारकरी धर्म आणि साहित्य परिषदेच्या संपर्क अभियानात सामील व्हावे.
हभप प्रल्हाद राऊत.
बुलढाणा:
वारकरी तथा अध्यात्मिक संस्थांना शासन प्रशासनाच्या अध्यादेशाप्रमाणे योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वारकरी धर्म परिषद संपर्क अभियान राबवीत असून त्यामध्ये जिल्ह्यातील संस्थानी सामील व्हावे असे आवाहन वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वारकरी तथा धार्मिक अध्यात्मिक संस्थां तथा वारकरी दिंडी, प्रवचनकार, कीर्तनकार, विणेकरी यांना शासन प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारकरी साहित्य परिषद तथा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने बुलढाणा स्थित संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन 31 ऑगस्टला करण्यात आले होते. यावेळी बैठकीचे अध्यक्ष तथा वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
यावेळी बैठकीला वारकरी धर्म परिषदेचे संयोजक हभप सतीशचंद्र रोठे पाटील तथा वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष
हभप प्रल्हाद महाराज राऊत, हभप कैलास पाटील, विजय पाटील, विजय साबळे पाटील, राम व्यवहारे, कमलाकर व्यवहारे, विलास काकर, भूपेश पाटील, सुशांत पाटील, सुरेखाताई निकाळजे, भारतीताई अवचार, यांच्यासह वारकरी सांप्रदायिक महाराज किर्तनकार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील धार्मिक, अध्यात्मिक तथा वारकरी संस्था, कीर्तनकार,प्रवचनकार यांनी वारकरी धर्म परिषद तथा वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहनही यावेळी सर्वानुमते करण्यात आले.
____
बैठकीमध्ये पुढील ठराव पारित.
बुलढाणा जिल्ह्यातील क आणि ब दर्जा असलेल्या सर्व वारकरी आणि धार्मिक संस्था यांना शासन प्रशासन विविध योजना पुरविण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील वारकरी धार्मिक संस्थांना आपले नाव कोणत्या दर्जामध्ये आहे याची माहिती नाही किंवा त्या अनुषंगाने अद्याप कोणताही पाठपुरावा संबंधित संस्थांनी केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बराच मोठा निधी दरवर्षी परत जात आहे. यासह वारकरी दिंडी कीर्तनकार प्रवचनकार विणेकरी यांचेही अद्याप मानधन मिळण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी शासन प्रशासन दरबारी प्रशासकीय तथा नियमानुसार मागणी पत्र सादर करण्यासाठी जिल्हाभर संपर्क अभियान राबविण्यात यावे असे सर्वानुमते ठराव पारित करून ठरवण्यात आले.
____
बुलढाणा
दिनांक :31/10/2025
0 Comments