Advertisement

शेगावच्या जुने बस स्थानक परिसरातून गांजा जप्त ?आरोपी ताब्यात

: शेगावच्या जुने बस स्थानक परिसरातून गांजा जप्त,!
आरोपी ताब्यात,!!

   : शेगाव येथील जुने बस स्थानक परिसरातून शहर पोलिसांनी एकाजवळून गांजा जप्त केला. ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात  कारवाई करण्यात आली. 
    : मागील अनेक वर्षांपासून शेगाव येथील जुने बस स्थानक परिसरात खुलेआम गांजा विकल्या जात होता. त्याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी संबंधितावर पाळत ठेवून बुधवारी सायंकाळी ४ वाजता सुमारास गांजा विक्री करणाऱ्या  इब्राहीम शाह सरदार शाह 40 वर्षे रा.इदगाह प्लॉट ता. शेगांव या युवकास रंगेहाथ पकडले व त्याचेजवळून 3 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा प्रति किलो 20,000 रुपये प्रमाणे 68,000 /- रुपये जप्त केला. तसेच आरोपीविरूध्द भान्यासंच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या कारवाईने गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

अहिल्या न्युज 24 न्यूज करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे शेगांव बुलडाणा

Post a Comment

0 Comments