आझाद हिंद सोबत आल्यास सन्मान जनक न्याय देऊ: टी.डी.अंभोरे पाटील.
बुलढाणा:
जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणूक रणसंग्रामात आझाद हिंद आमच्या सोबत आल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ. या अनुषंगाने आमची प्राथमिक चर्चा समविचारी पक्ष आणि संघटनांसोबत सुरू आहे. लवकरच अंतिम चर्चा झाल्यावर निर्णय जाहीर करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते टी.डी.अंभोरे पाटील यांनी व्यक्त केले.
बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते टी.डी.अंभोरे पाटील यांनी आझाद हिंद च्या संपर्क कार्यालयाला भेट देत निवडणुकीच्या अनुषंगाने प्राथमिक टप्प्यातील चर्चा केली.आझाद हिंद च्या 30 वर्षाच्या कार्याला आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आझाद हिंद चे ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील,जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राम व्यवहारे, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आशाताई गायकवाड, ग्राम स्वराज्य समितीचे संयोजक कमलाकर व्यवहारे, भूपेश पाटील, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
_
निवडणुकीत आझाद हिंदची भूमिका निर्णय ठरणार.
आझाद हिंदच्या मागील तीस वर्षाच्या आक्रमक आंदोलन आणि जनहितार्थ केलेल्या कार्यामुळे आझाद हिंद शेतकरी संघटनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असून येणाऱ्या काळात आझाद हिंद काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यापूर्वी नुकतीच भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सुद्धा आझाद हिंदच्या कार्यालयाला भेट देऊन सोबत येण्याची विनंती केलेली आहे. तर अद्याप आझाद हिंद ने कोणताही निर्णय जाहीर केलेला नसून त्यांच्या भूमिकेकडे आता जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
_
बुलढाणा
दिनांक : 09/11/2025
0 Comments