*नाकर्त्या राजकारण्यांना कंटाळून तिरुपती नगर वासियांचा मतदानावर बहिष्कार*
प्रतिनिधी नांदुरा:-
नांदुरा येथील तिरुपती नगर वासी व या रस्त्यावरून ये - करणारे शेकडो नागरिक यांनी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार घातला आहे.
याबाबत सविस्तर असे की
तिरुपती नगर वासी
गेल्या १० वर्षांपासून रस्ता पुल व नाल्यांची मागणी करत आहेत.
परंतु आमच्या वेळेस निधीची कमतरता असते व इतर भागांत विकासकामे करण्यासाठी निधीचा पुर उपलब्ध असतो.
आमचं जगणंच जणू शासन व प्रशासन यांनी नाकारले आहे व आमच्या मूलभूत मागणीचे जाणीवपूर्वक हनन सुरू आहे.
आमच्याकडे नाल्या नाहीत यामुळे आम्ही वापरलेले संडास बाथरुमचे घाण पाणी काहींचे रस्स्यावर तर काहींचे शोष खड्ड्यात जाते.आणि तेच पाणी आमच्या विहिरीमध्ये पाझरून ते घाण पाणी आम्हाला काढून परत प्यावे लागते.तसेच पावसाळ्यात चिखल होतो व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याची व आम्हा सर्वांची गैरसोय होते.याबाबत २०१५ पासून आम्ही लोकशाही मार्गाने अनेक निवेदने व आंदोलने केली.परंतु आम्हाला फक्त खोटी व लेखी आश्वासनेच मिळाली हे दुर्दैव आहे.म्हणून या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आम्ही तिरुपती नगर वासियांनी सर्वानुमते होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे असे पत्र स्थानिक रहिवाशी असलेल्या नागरिकांनी निवडणूक अधिकारी,तहसीलदार व न.प.मुख्याधिकारी यांच्या सुरू असलेल्या न.प.निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत जाऊन पत्रकार परिषद अर्ध्यावर थांबवून दिले.यावेळी तिरुपती नगर येथील सत्पत महिलांनी चांगलाच गदारोळ केला.
0 Comments