Advertisement

काकणवाडा शिवारात वाघाचे दर्शन,!शमशानभूमी परिसरात वाघ फिरत असल्याचें साक्षात दर्शन वन विभाग सतर्क!

संग्रामपूर,,बुलडाणा 

काकणवाडा शिवारात वाघाचे दर्शन,!

शमशानभूमी परिसरात वाघ फिरत असल्याचें साक्षात दर्शन वन विभाग सतर्क!  

संग्रामपूर तालुक्यातील  काकणवाडा शिवारात आज दुपारी तेल्हारा रोडवरील  शमशानभूमीच्या पलीकडे वाघ दिसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावातील अनेक नागरिकांनी शिवारात वाघ फिरत असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले आहे.

ही माहिती समजताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असता वाघाच्या हालचालींचे काही ठसे व संभाव्य फिरस्त्या मार्गांची नोंद घेतली. मात्र, वाघाचा अचूक ठावठिकाणा लागू शकलेला नाही.

वन विभाग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
“काकणवाडा शिवारात वाघाचे अस्तित्व असल्याच्या प्राथमिक सूचना मिळाल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.”
दुपारच्या सुमारास शमशानभूमी  जवळ  परिसरात वाघाचे दर्शन झाले, परिसरात वाघ फिरताना दिसला.असल्याचे  नागरिकांनी सांगितले काही लोकांनीही ही घटना पाहिली.”
वन विभागाकडून नागरिकांना अनावश्यकपणे शिवारात किंवा जंगलाच्या दिशेने जाऊ नये
जनावरांना मोकाट सोडू नये
कुठेही हालचाल आढळल्यास वन विभागाला त्वरित कळवावे असे सूचना तथा आवाहन केले आहे
काकणवाडा व परिसरातील नागरिकांमध्ये सध्या मोठी भीती व संभ्रमाचे वातावरण असून वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

अहिल्या न्युज 24 करिता 
सौं सरलाताई राजेंद्र ससाणे 

संग्रामपूर, बुलडाणा

Post a Comment

0 Comments