Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पक्षाच्या वतीने श्री संजय बाबन पारवे यांना नगराध्यक्ष पदाकरिता पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित

  आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 जळगाव जामोद निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पक्षाच्या वतीने श्री संजय बाबन पारवे यांना नगराध्यक्ष पदाकरिता पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करीत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा महाविकास आघाडी मध्ये जागा लढवू इच्छित होतो, परंतु बैठकीअंती काँग्रेस पक्षासोबतच्या वाटाघाटीत चार जागा वाटल्या आल्या होत्या, वाटाघाटी मध्ये चार जागा मिळाल्यामुळे उर्वरित तयारी केलेले तीन उमेदवार असताना देखील आम्ही त्यांना एबी फॉर्म दिले नाही परंतु शिवसेना उबाठा पक्षाने आमच्या पक्षाच्या दोन उमेदवारांविरोधात अधिकृत उमेदवारी घोषित करून आघाडी बिघाडी करण्याचे काम केले. काँग्रेस पक्षाला आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारा विरोधा उमेदवार उभा करणाऱ्या पक्षाला सोबत ठेवू नये म्हणून वारंवार विनंती केली सुरुवातीपासून झालेल्या बैठकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत कुठेच होणार नाही ही भूमिका सर्वांचीच होती तरीसुद्धा शिवसेना उबाठा पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवार देऊन आघाडीत एक प्रकारचा द्रोह करून आमच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने त्याबाबत ठोस  भूमिका न घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रयत्न देखील थेटे पडले त्या मुळे नाईलाजास्तव आज आम्हाला आघाडीच्या बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
 आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने श्री संजय बाबन पारवे यांना पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करून आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

Post a Comment

0 Comments