चिखलीमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष निवडून द्या... विकासाची जबाबदारी माझी... मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर वचन
"चिखली नगरपालिका निवडणूक म्हणजे शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची संधी चिखलीकरांना मिळाली आहे, या संधीचे सोने करा, चिखलीमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष निवडून द्या, विकासाची जबाबदारी माझी आहे," असे वचन आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी चिखली येथे दिले.
जाहीर सभेसाठी चिखलीत आगमन व भव्य स्वागत:
चिखली नगराध्यक्षपदाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. पंडितदादा देशमुख तसेच 28 नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आज चिखलीत दाखल झाले तेव्हा माता रेणुकादेवी मंदिराच्या पावन सान्निध्यात त्यांचे भव्य स्वागत केले.
मा. मुख्यमंत्री महोदय पुढे म्हणाले की, "चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेता महाले यांनी विकासासाठी मागितलेल्या प्रत्येक निधीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचा ठोस परिणाम म्हणजे चिखलीमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर भौतिक सुविधांमधील सुधारणांमधून दिसून येत आहे. त्यामुळे आता आ. सौ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनात चिखली नगरपालिका निवडणुकीतही भाजपा उमेदवारांची निवड करावी", असे आवाहन मा. मुख्यमंत्री महोदयांनी केले.
मा. देवाभाऊ विदर्भाचे कोहिनूर:
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस हे 'विदर्भाचा कोहिनूर' आहेत. मा. देवेंद्रजी जेव्हा-जेव्हा चिखलीत येतात, तेव्हा या राजकीय चिखलात कमळच फुलते. त्यामुळे आजची सभा ही विजयाची सभा ठरेल," असा विश्वास या वेळी व्यक्त केला
0 Comments