Advertisement

सुनगाव येथे शेताच्या रस्त्यावरून वाद, कुऱ्हाडीने घाव घालून केले जखमी

सुनगाव येथे शेताच्या रस्त्यावरून वाद, कुऱ्हाडीने घाव घालून केले जखमी
जळगाव जामोद 
सुनगाव येथे दिनांक 25 नोव्हेंबर 8 वाजताच्या सुमारास शेताच्या रस्त्यावरून वाद होऊन त्यामध्ये गणेश पाटील व त्यांची पत्नी प्रभा पाटील यांना पंकज श्रीकृष्ण भगत या ने कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याची घटना घडली. याविषयी जळगाव जामोद पोलिसात सौ प्रभा गणेश पाटील यांनी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की पंकज श्रीकृष्ण भगत वय अं.30 वर्ष, श्रीकृष्ण भगत वय अंदाजे 50 वर्ष दोन्ही रा. सुनगांव ता. जळगाव जामोद यांच्यामध्ये आमचा शेताच्या रस्त्यावरुन वाद आहे. दिनांक 25 नोव्हेंबर रोजी 8 वाजता मी व माझे पती  शेतात बैलबंडी घेवुन जात असतांना अंदाजे 07.45 वा ते 08.00 वा दरम्यान आरोपी पंकज भगत यांचे शेताजवळ पोहचले असता आरोपी पंकज भगत हा रस्त्यात त्याचे हातात कु-हाड घेवुन उभा होता  मी त्याला बाजुला हो असे म्हटले व बैलबंडी घेवुन रस्त्याचे कडेने जात असतांना पंकज भगत हा त्याचे हातातील कु-हाडीसह आमच्या बैलबंडीत कुदला मला व माझे पतीला जिवाने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील कु-हाडीने दोघांच्या डोक्यावर फिर्यादीचे पाठीवर, छातीवर, घाव घालुन गंभीर जखमी केले तसेच आरोपी  श्रीकृष्ण भगत याने जिवाने मारण्याची धमकी दिली. आरोपीने जखमी केल्याने फिर्यादी व तिच्या पतीला उपचारअर्थ अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. फिर्यादी चे बयाणावरुन अपराध दाखल करुन पोलिसांनी कलम १०९ (१), ३५१ (३), ३(५) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास  ठाणेदार यांचे आदेशाने सपोनि नागेश मोहोड यांच्याकडे देण्यात आला.

Post a Comment

0 Comments