Advertisement

शिवसेना उबाठा तर्फे नगराध्यक्ष पदासाठी कार्यक्षम युवा नेतृत्व पवन गजानन अवचार यांचा उमेदवारी अर्ज दाखल...!

जळगाव जा, बुलडाणा

* शिवसेना उबाठा तर्फे नगराध्यक्ष पदासाठी कार्यक्षम युवा नेतृत्व पवन गजानन अवचार यांचा उमेदवारी अर्ज दाखल...!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगर परिषद निवडणूक 2025 साठी मजबूत आणि कार्यक्षम नेतृत्वावर भर देत, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या युवा नेतृत्व पवन गजानन अवचार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत अधिकृतपणे मशाल या चिन्ह वर त्यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.पवन गजानन अवचार यांनी उत्साहात आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची सदिच्छा भेट घेतली. निवासस्थानी त्यांच्या आगमनानंतर पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
“जळगाव जामोदच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित, कर्तृत्ववान आणि जनसामान्यांच्या भावनांशी जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. जळगाव जामोदकरांच्या आशिर्वादाने हे सक्षम नेतृत्व निश्चितच पुढे येईल.”
पवन गजानन अवचार यांची उमेदवारी ही  शिवसेना उबाठा कडून युवक नेतृत्वाला दिलेले प्रोत्साहन मानली जात असून, शहरातील विकास प्रक्रियेला नवी गती देण्याचा संकल्प आजच्या उपस्थितीतून स्पष्ट दिसून आला.
नगर परिषदेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख कामकाज यासाठी कटिबद्ध असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाने अवचार यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत मशाल चिन्हवर दमदार शर्यत सुरू केली आहे.

अहिल्या न्युज 24 करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे 

जळगाव जा बुलडाणा

Post a Comment

0 Comments