पक्ष विरोथी कारवाई केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी चे पक्ष विरोधी कार्य केल्या प्रकरणी जिल्हा सदस्यांसाह जळगाव जा तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी,,!!
नवीन करकारिणी जाहीर,,
दिनांक 18/11/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी चे महासचिव महाराष्ट्र प्रदेश किसन चव्हाण नुकतेच हकालपट्टी पत्र व नवं नियुक्ती पत्र जाहीर केले त्यामध्य जळगाव जा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष रमेश नाईक, युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे,तालुका सचिव साहेबराव भगत,युवा शहर अध्यक्ष प्रवीण तायडे व बुलडाणा जिल्हा सदस्य, स्वनील गवई यांची पत्रकाद्वारे पक्षातून तात्काळ हकाल पट्टी करण्यात आली असल्याचे पत्र प्राप्त झाले जळगाव जा मध्ये वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार उभे असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार ला पाठिंबा देऊन पक्ष विरोधी कारवाया केल्या बद्दल सर्व पदाधिकारी यांची वंचित बहुजन आघाडी तुन तात्काळ हाकल पट्टी करण्यात आली,
असून नुकतीच नवीन कार्यकारिणी नेमणूक करण्यात आली जळगाव जामोद चे नवनियुक्त तालुका अध्यक्ष देवानंद कैलास दामोदर,तालुका महासचिव संदीप उगले,व सुनील बोदडे, उपाध्यक्ष विजय सातव, निलेश वानखडे,असमात खान मुल्ला खान,भीमराव हेलोडे,संतोष तिजारे,सल्लागार रतन नाईक,संघटक पदी प्रशांत अवसरमोल,कैलास भगत,संतोष भारसाकळे,सुनील तायडे यांची वंचित बहुजन आघाडी ची पत्रकाद्वारे नवं नियुक्ती करण्यात आली,
अहिल्या न्युज 24 करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे ची बातमी,
जळगाव जा, बुलडाणा
0 Comments