जळगाव जा बुलडाणा
जळगाव जामोद नगर परिषद चे नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे उमेदवार यांच्या प्रचाराला सुरुवात,,,!
महाविकास आघाडीसह घटक पक्षाचे उमेदवारानी प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला केली सुरुवात,!!.*
महाविकास आघाडी चे प्रचार रॅलीत राष्ट्रवादी चे पदाधिकारी नसल्याने राष्ट्रवादी मध्ये नाराजी,,?
दिनांक 23/11/2025 रोजी सकाळी 9 वाजता जळगाव शहरातील राजा भारतारी महाराज मंदिर येथे प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली, नंतर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गजानन सुर्यवंशी, समाजवादी पक्षाचे सय्यद नफिज सह नगरसेवक उमेदवार व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आघाडीची एकजूट, संघटनशक्ती आणि नगर परिषद निवडणुकीसाठीचा दृढ संकल्प अधोरेखित केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थिती नव्हती तर शिवसेना (उबाठा गट) चे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ,समाजवादी पार्टीचे सय्यद नफिज,, मुस्ताक जमदार,
जळगाव जामोद विधानसभेच्या नेत्या स्वातीताई वाकेकर,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील,
पंचायत राज संघटनेचे समन्वयक अविनाश उमरकर,
पक्ष निरीक्षक संभाजी शिर्के
तालुकाध्यक्ष भाऊराव भालेराव,
शिवसेनेचे नेते मुस्ताक भाईजान,तुकाराम काळपांडे
काँग्रेसचे युवा नेते समाधान दामधर,आसिफ भाई इकबाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ,काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अमर पाचपोर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इरफान पठाण,
शिवसेनेचे शहराध्यक्ष रमेश ताडे
कार्याध्यक्ष नासिर शेख
यासह महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुर्यवंशी यांना समर्थन दर्शवले.गजानन सुर्यवंशीव व नगरसेवक उमेदवार यांच्या सोहळ्यामुळे नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रचारात दमदार सुरुवात केली असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादि शरदचंद्र पवार गटाचे चे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी वगळता आघाडीच्या एकसंघ शक्तीची झलक या उपस्थितीमधून दिसून आली,.
अहिल्या न्युज 24 करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे ची बातमी
0 Comments