Advertisement

श्री संत केशवराज महाराजांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी...! अकरा क्विंटल महाप्रसादाचे वाटप,!!

श्री संत केशवराज महाराजांची पुण्यतिथी  विविध कार्यक्रमांनी साजरी...! 

अकरा क्विंटल महाप्रसादाचे वाटप,!!

 संग्रामपूर तालुक्यातील  चांगेफळ बु. चे आराध्य दैवत श्री संत केशवराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 22 नोव्हेंबर शनिवार  रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांना  11 क्विंटल  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत केशवराज महाराज नगरी  चांगेफळ बु.येथे 15 नोव्हेंबर रोजी स्वामी राम भारती महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून  ह.भ. प. रामदास महाराज तायडे निरपुरकर  यांच्या वाणीतून संगीतमय महाशिवपुराण कथेला सुरुवात करण्यात आली. व सातही दिवस  विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय झाले होते.कथेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून गावातील वातावरण भक्तिमय झाले होते .चांगेफळ गावात जणू काही दिवाळी  होती. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी  चहापाणी पोहे याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली होती, या दरम्यान विशेष म्हणजे पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.आज शनिवार रोजी  नगर प्रदक्षिणा करून  मंदीरात आरती केल्यानंतर  महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले. गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक भाविक अशा हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाविकांचा उत्साह  ओसंडून वाहत होता. गावकरी व टाळकरी व पंचक्रोशीतील सेवाधारी वृंद यांना सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन संत केशवराज महाराजांचे आशीर्वाद घेतले.यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

अहिल्या न्युज 24 करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे 

संग्रामपूर, बुलडाणा

Post a Comment

0 Comments