Advertisement

रोटी ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यात यावा मनसेची मागणी*आ. चैनसुख संचेती यांना दिले निवेदन

*रोटी ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यात यावा मनसेची मागणी*
 *आ. चैनसुख संचेती यांना दिले निवेदन*
*मलकापूर:* मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा तालुक्यातील रोटी ते भोटा व भोटा ते कालवड इजिमा ५४ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहन चालविणे धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात तर खड्ड्यात पाणी साचून रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. विद्यार्थी व शेतकऱ्यांना नांदुरा येथे तालुक्याच्या ठिकाणी जाणे-येणे डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सदर रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री चैनसुख संचेती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की रोटी ते भोटा सदर रस्ता हा भारताला स्वातंत्र्य मिळून देखील अनेक वर्षे होऊनही अद्याप देखील पुर्णतः पुर्णत्वास गेला नसुन सदर रस्ता डांबरीकरण करण्यात यावा.करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments