जळगाव जामोद शहरातील प्रसिद्ध युवर्स फिटनेस जिम व निधी डायट क्लिनिकचे संचालक धुळे दाम्पत्यांनी श्रीलंका येथे २६ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर दरम्यान पार पड़लेल्या जागतीक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जलगांव जामोद येथील कैलास धुळे आणी त्यांच्या धर्मपत्नी निधि धुळे यांनी भारतातर्फे सहभाग नोंदवुन प्रतिस्पर्धी आस्ट्रेलिया, नेपाल, रशिया, पाकिस्तानी खेलाडू वर मात करत सार्वाधिक वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला...
यामध्ये , कैलास धुले तीन स्वर्ण पदके व निधि धुळे यानी तीन स्वर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले आहे...
सदर स्पर्धे साठी त्यानी विशेष मेहनत घेतली असुन त्यांच्या अथक परिश्रम नंतर त्यानी जागतीक अंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कैलास धुळे व निधि धुले यानी यापुर्वी राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदके मिलवले असुन कैलास धुळे स्ट्रांग मैन ऑफ इंडिया २०२५ व निधि धुळे स्ट्रांग उमेन ऑफ इंडिया २०२५ अवॉर्ड आपल्या नावावर केले आहे...त्यानी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे सर्वच स्थरातुन त्यांचे कौतुक होत आहे.... यानुशांगाने अनेक मान्यवरानी या होतकरू खेळाडूंचे खुप अभिनंदन करून त्याना पुढ़ील उज्वल भविष्यसाठी सुभेच्छा दिल्या आहेत...
0 Comments