स्ट्रॉंग रूम समोर अँड.रोठे मुक्कामी जाणार.
बुलढाणा :
बुलढाण्यातील नियमबाह्य झालेली प्रभाग रचना, बुथ रचना आणि अंतिम मतदार यादी विद्यमान सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना दोन डिसेंबरला मोठ्या प्रमाणात झालेले बोगस मतदान, हाणामारी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, स्ट्रॉंग रूम समोर राहण्याची परवानगी द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आज 5 डिसेंबरला शासन प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
निवेदनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नियमबाह्य झालेली अंतिम प्रारूप मतदार यादी, प्रभाग रचना जाणीवपूर्वक बोगस मतदान करण्यासाठी करण्यात आलेली होती. या अनुषंगाने पंधरा दिवसांपूर्वी शासन प्रशासनाला माहिती सुद्धा देण्यात आलेली होती. परंतु त्वरित दखल न घेतल्यामुळे बुलढाणा मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक मार्फत राज्यपाल, लोकपाल, मुख्यमंत्री, निवडणूक आयोग आदींना निवेदन देत करण्यात आली आहे. निवेदनात नमूद मागण्यांची त्वरित पूर्तता करून कारवाई न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेत प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
__
आजपासून स्ट्रॉंग रूम समोर अँड सतीशचंद्र रोठे मुक्कामी जानार.
निवडणूक निर्णय अधिकारी कडून विशेष परवानगी.
आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास आघाडी, बुलढाणा शहर विकास आघाडी, रमाई ब्रिगेड, ग्रामस्वराज्य समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.उर्मिलाताई सतीशचंद्र रोठे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून मतदानाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम समोर 24 तास राहण्यास आणि झोपण्यास करी तात्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून दैनंदिन 24 तास पहारा देणार असल्याची माहिती ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जाहीर केली आहे.
__
बुलढाणा
दिनांक : 05/12/2025
0 Comments